सहभागी  व्हा

CYCLIST 7 (WOMAN & GIRL) flipपुणे महानगरपालिकेच्या ‘पुणे सायकल आराखडा’ साठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात येत आहेत. सायकलस्वारांकडून मुख्यत्वेकरून खालील बाबींविषयी सूचना अपेक्षित आहेत.

 • सायकल मार्ग: आवश्यक पायाभूत सोयीसुविधांविषयी
 • स्वतंत्र सायकल मार्ग, फक्त सायकलींसाठी रस्ते यांच्या स्थानाविषयी सूचना
 • सायकल स्टॅण्ड, सायकल पार्किंग यांच्या स्थानाविषयी सूचना
 • असुरक्षित ठिकाणे: असुरक्षित ठिकाणे, रस्ते, चौक जेथे योग्य सुविधा आणि व्यवस्थापन यांची आवश्यकता आहे त्याविषयी माहिती द्या.
 • सायकलिंगचा प्रसार: पुणे शहरामध्ये सायकलचा एक वाहतूक पर्याय म्हणून कसा प्रसार करता येईल यासाठी सूचना.
 • भागीदारी: सायकलिंगची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि सायकल चालवणा-यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शैक्षणिक संस्था, कार्यालये, सार्वजनिक संस्था यांच्याबरोबर भागीदारी करणे.

तुमच्या सूचना आणि सध्या चालू असलेले सर्वेक्षण व विविध अभ्यास यांचे निष्कर्ष हे सायकल आराखड्यासाठी वापरले जातील.


सहभागी कसे व्हावे?

तुमच्या सूचना मांडण्यासाठी खालीलप्रमाणे विविध पर्याय आहेत:

 • कृपया ऑनलाइन सूचना वर क्लिक करा आणि माहिती वं सूचना नोंदवा.
 • तुमच्या क्षेत्रीय कार्यालयात आयोजित जनसभेमध्ये सहभागी व्हा – या बैठकींचे/सभांचे वेळापत्रक या संकेतस्थळावर आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केले जाईल. जून २०१६ महिन्यात होणाऱ्या सभांचे वेळापत्रक
 • क्षेत्रस्तरीय जनसभांच्या दोन फे-या होतील
 • पहिली फेरी, जून २०१६- जेथे आपण सायकल आराखड्याचा प्रारंभिक मसुदा तयार करण्यासाठी आपल्या सूचना देऊ शकता.
 • दुसरी फेरी, जुलै २०१६- जेथे आपण सायकल आराखड्याचा प्रारंभिक मसुदा पाहू शकता आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचना देऊ शकता.
 • खालील ठिकाणी आपण आपल्या सूचना नोंदवू शकता:
Email: punecycleplan@gmail.com
पत्र: कृपया ‘पुणे सायकल आराखडा’ असा विषय लिहून खालील पत्त्यावर पाठवा,
वाहतूक विभाग, पुणे महानगरपालिका,
तिसरा मजला, वीर सावरकर भवन, शिवाजीनगर, पुणे ४११००५

 

Advertisements