पुणे सायकल आराखडा

जन सभांचे वेळापत्रक

वाहतूक समस्या ही पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची समस्या आहे. BikesCarsPuneपुण्यामध्ये दररोज ८००पेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी होते. या वाढत्या वाहनसंख्येमुळे हवा प्रदूषण, आरोग्यावर दुष्परिणाम, अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय अशा समस्या निर्माण होत आहेत. रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाणपूल बांधणे हे यावरील दीर्घकालीन उपाय होऊ शकत नाहीत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रदूषणविरहित वाहतूक पर्यायांनी नागरिकांना सुरक्षितपणे आणि कमी खर्चात प्रवास (Moving people safely and economically by emphasizing public transport and non-motorized transport) हे ध्येय सर्वंकष वाहतूक आराखड्या मध्ये स्वीकारले आहे.

पदपथ सुधारणा, सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेमध्ये गुंतवणूक, पार्किंग नियमन, वाहतूक समस्यांविषयी शिक्षण व प्रसार  आणि वाहतूक नियमांची कठोरपणे अंमलबजावणी इत्यादी उपाय सर्वंकष वाहतूक आराखड्या मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रदूषणविरहित वाहतूक पर्यायांमध्ये चालणे आणि सायकल चालवणे यांचा समावेश होतो. प्रदूषणविरहित वाहतूक पर्यायांमध्ये सुधारणा होण्यासाठी, सुधारित रस्ते आराखडा, पदपथ आणि चौक सुधारणा आणि सर्वंकष सायकल आराखडा यांची आवश्यकता आहे.

सध्या एकूण खेपांपैकी ३२% खेपा या चालणे आणि सायकल या पर्यायांनी होतात. २०३१पर्यंत किमान ५०% खेपा या चालणे आणि सायकल या पर्यायांनी ह्वाव्यात असे ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ सुचवतो. पुणे शहरात सध्या  कामावर जाण्यासाठी होणारया खेपांपैकी, २३% खेपा चालणे या पर्यायाने होतात.

9 to 25शहरात होणा-या एकूण खेपांपैकी सायकलने कामावर जाण्यासाठी होणारया खेपांचे प्रमाण ९% वरून २५%पर्यंत वाढू शकेल का?

यासाठी पुणे महानगरपालिका, ‘सर्वंकष पुणे सायकल आराखडा’ तयार करत आहे ज्यामध्ये खालील मुद्द्यांवरील शिफारसींचा समावेश असेल –

  • पायाभूत सोयीसुविधा जसे की, पार्किंग आणि सायकल मार्गांचे जाळे
  • ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार आराखड्याची टप्या-टप्याने अंमलबजावणी
  • आर्थिक अंदाजपत्रक
  • पुणे महानगरपालिकेमध्ये अंमलबजावणी यंत्रणा आणि कर्मचारी संरचना

सायकल आराखडा तयार करण्यामध्ये नागरिकांचा सहभाग

नागरिकांचा सहभाग आणि सूचना ‘पुणे सायकल आराखडा’ तयार करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. सहभागी होण्यासाठी नागरिकांना विविध संधी उपलब्ध आहेत. आपले विचार नोंदवण्यासाठी नागरिक सहभाग  हा विभाग पहा.


आराखडा तयार करण्याच्या पद्धतीविषयी

पुणे शहरासाठी सर्वंकष सायकल आराखडा तयार करण्याचा प्रकल्प हा भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयातर्फे अनुदानित आहे.

पुणे महानगरपालिका वाहतूक नियंत्रण विभाग हा आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करत आहे. पुढील काही वर्षात आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम, पुणे महानगरपालिकेचा ‘प्रदूषण विरहित वाहतूक विभाग’ हाती घेईल.

पुणे शहर सर्वंकष सायकल आराखडा तयार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने i-Trans (Innovative Transport Solutions Pvt. Ltd), प्रसन्न देसाई आर्किटेकट्स आणि पर्यावरण शिक्षण केंद्र या संस्थांचा गट (संघ) सल्लागार म्हणून नियुक्त केला आहे.

Advertisements